Wednesday, October 6, 2010

५ दिवसात फोटोग्राफर कसं बनायचं?

दिवस १:

तुम्हाला seriously कॅमेरा घ्यायचाय का? तुमच्या 'Pro' मित्राला विचारा कुठला घेऊ.
ProTip: एकालाच विचारा. अनेकांना विचारला तर सगळे मिळून इतका confusion करतात की पुढचे दोन महिने नक्की कुठला कॅमेरा घेऊ विचार करण्यातच जातात.

दिवस २:
उगाच internet वर reviews वाचल्यासारखं करा. म्हणजे तुमचा कॅमेरा कुठला घ्यायचा fix असतो, पण तरी timepass म्हणून 'हा बाबा काय म्हणतोय. ती बाई काय म्हणतीये' बघून ठेवा. म्हणजे 'Pro' मित्रांनी विचारलं की reviews वाचले का? की हो म्हणता येतं.

दिवस ३:
तो पहिल्या दिवशीच ठरवलेला कॅमेरा विकत घेऊन या. अन मग जरा हवा करा. facebook वर वगैरे टाका 'Bought new camera n it 's awesome!' वगैरे. तेवढ्याच comments येतील जरा.

दिवस ४:
थोडे photos काढायचा try करा. या दिवशी तुम्हाला कळत की तुम्हाला कॅमेर्यातलं ओ का ठो कळत नाही. मग थोडा वेळ वाटायला लागत की च्यायला उगाच आणला कॅमेरा.
Tension नका घेऊ. एक काम करा. परत Internet वर जाऊन जरा keywords वाचा. जरा ५-१० terms चा रट्टा मारा. लगेच वाटायला लागतं की येतं थोडंफार.

दिवस ५:
haan. आता आज कॅमेरा घेऊन कुठेतरी चांगल्या ठिकाणी जा. इतके पैसे टाकून घेतलेला कॅमेरा इतका भारी असतो की तुम्हाला स्वताला काही फारसं करावं लागत नाही. करूही नका. उगाच चांगला कॅमेरा बिघडायचा.
१०० फोटो घ्या, एक तरी चांगला येतोच. टाका facebook वर. उगाच हवा करायला काहीतरी aperture, shutter speed, exposure वगैरे शब्द वापरा.

Thats it! झाला की तुम्ही फोटोग्राफर

Source - http://reflexions.prajwalit.com/

1 comment:

  1. साफ चुकीचा व्ह्यू आहे. चांगला कॅमेराच सगळे काही असते तर मग सगळे श्रीमंत आणि चांगल्या कॅमेरावाले लोक भारी फोटोग्राफर नसते का झाले? चांगला किंवा जरा बरा फोटो काढण्यासाठी एकाच जागी पहाटे तीन वाजता उठून सलग चार दिवस जावे लागते. एका ठिकाणी बसून परफेक्ट लाईट, मोमेंट, अँगल, कॅमेरा सेटिंग्ज यांची आराधना करावी लागते.

    ReplyDelete